आज - 06 डिसेंबर - ज्येष्ठ रंगकर्मी, गायक अभिनेता, हार्मोनियम वादक आनंद शंकर पाटणकर यांचा वाढदिवस -

आज  - 06 डिसेंबर  - 

 

ज्येष्ठ रंगकर्मी,  गायक अभिनेता, हार्मोनियम वादक  

आनंद शंकर पाटणकर यांचा वाढदिवस  - 

 

जन्म  - 06 डिसेंबर, 1966

 

आनंद यांचा जन्म रत्नागिरीतील निवखोल येथे  06 डिसेंबर 

रोजी झाला. त्यांचे वडील पौरोहित्य करत असत. शालेय 

शिक्षण रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल मधून झाले असून  त्यांनी B. Sc. ही पदवी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून घेतली आहे.  त्यानंतर आनंद यांनी  B. Ed. ही शिक्षण 

क्षेत्रातील पदवीही प्राप्त केली आहे.  

33 - वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. गणित विषयाचे 

अध्यापन करत असत.  26 - वर्षे शिक्षक जागुष्टे 

हायस्कूल कुवरबाव. त्यानंतर 04 - वर्षे पर्यवेक्षक फाटक हायस्कूल, रत्नागिरी व  नंतर 03 - वर्षे फाटक 

हायस्कूलमध्येच उपमुख्याध्यापक म्हणून पदोन्नती. 

मात्र 31 जुलै, 2023  रोजी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती 

स्वीकारली असून निवृत्तीनंतरचे जीवन जगत आहेत.  

 

शाळा महाविद्यालयात असल्यापासून विविध नाटके तसेच एकांकिका मधून विविध भूमिका केल्या आहेत.अनेक 

पारितषिके ही प्राप्त झाली आहेत. त्यांना संगीता विषयी 

विशेष रुची होती. त्यांचे काका विनायकराव हे उत्तम 

कीर्तनकार होते.  

आधी छोट्या मोठ्या भूमिका केल्यानंतर आनंद राधाकृष्ण 

कला मंच या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून विविध नाट्य 

स्पर्धांमध्ये आपला अभिनय सादर करू लागले. गेली  

35 -  वर्षे ते  रंगभूमीची सेवा करत आहेत.  

गायनाचे शिक्षण सुरू आहे. कै.भा. ल. रानडे, विश्वनाथ ओक 

सर तसेच गेली 29 -  वर्षे पंडित प्रसाद गुळवणी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू आहे.

आतापर्यंत गाण्याचे सुमारे 200 कार्यक्रम केले. यात काही एकट्याने तर काही सहागायकांसह. 

आजपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांना आनंद यांनी 

साथसंगत केली आहे. सुमारे 500 - कीर्तनाची हार्मोनियम 

साथ संगत केली आहे.

आनंद यांचा निरनिराळ्या  सामाजिक कार्यात सक्रिय 

सहभागी असतात.  तसेच शैक्षणिक सामाजिक संस्थांमध्ये 

त्यांचा सहभाग असतो. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय 

या 195 -  वर्षांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात 

जुन्या ग्रंथालयाचे गेल्या दहा वर्षापासून कार्यवाह म्हणून 

कार्यरत.

 

आनंद  यांनी अभिनित केलेली 

● संगीत नाटके व भूमिका - 

देवमाणूस ---- अनिल

सौभद्र ------- अर्जुन

जय जय गौरी शंकर ------ नारद

स्वरयात्री ------- देवाशिष ( नाटकाचे लेखक - प्रा.डॉ.

श्रीकृष्ण जोशी रत्नागिरी )

सूर संजीवनी ------- सुधांशू (नाटकाचे लेखक प्रा.डॉ.

अतुल पित्रे रत्नागिरी)

पंडितराज जगन्नाथ ----- जगन्नाथ

कट्यार काळजात घुसली ------ सदाशिव

मंदारमाला ------- मंदार

सूर संजीवनी या नाटकाचे संगीत दिग्दर्शन. 

 

● गद्य नाटके व भूमिका - 

टूरटुर ------ शाहीर

वादळ माणसालतय ---- बाबा (बाबा आमटे यांच्या 

जीवनावरील नाटक)

 

आजपर्यंत अनेक पारितोषिके प्राप्त आनंद यांची विशेष उल्लेखनीय पारितोषिके  - 

■ 2003  राज्य नाट्य स्पर्धेत संगीत पंडितराज जगन्नाथ या नाटकातील जगन्नाथ या भूमिकेसाठी अभिनयाचे रौप्य पदक.

■ 2005  दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय संगीत नाट्य स्पर्धेत मंदारमाला या नाटकातील मंदार या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट 

गायक अभिनेता प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त.

■ 2008   वामन दाजी राज्यस्तरीय शास्त्रीय संगीत स्पर्धा (कणकवली) या मध्ये तृतीय क्रमांक 

 

आनंद यांना रत्नागिरी मीडिया परिवाराकडून तसेच वैयक्तिक आमच्या कुटुंबीयांकडून वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा  

💐🌹🍩🎂🌹💐

 

माहिती संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी. 

माहिती नावासह Like,  Share  & Forward  करण्यास हरकत नाही.