आज 05 नोव्हेंबर -
मराठी रंगभूमी दिन -
आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय
नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेकडून यावर्षीचा रंगभूमी
दिन रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहाच्या प्रवेश
पायर्यांवर प्रतिवर्षीप्रमाणे साजरा होत आहे.
या कार्यक्रमात गेल्या दोन वर्षांपासून रत्नागिरीतील दोन
ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार करण्याचे नाट्य परिषद रत्नागिरी
शाखेकडून ठरविण्यात आले आहे. त्याप्रमाणे यावर्षीचा
ज्येष्ठ रंगकर्मी सत्कारार्थी होण्याचा मान केवळ ज्यांची उपस्थिती हीच एक आनंदाची आणि उत्साहाची पर्वणी ठरते असं सदा आनंदी नाव म्हणजे डॉ.भगवान नारकर यांना मिळणार आहे.
तर दुसरे ज्येष्ठ रंगकर्मी सत्कारार्थी आहेत उत्सवी रंगभूमी ते स्पर्धात्मक रंगभूमी असा लीलया वावरणारा अवलिया हे बिरुद असलेले रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मीं म्हणजे विलास तथा भैय्या मयेकर यांना मिळणार आहे.
दोन्ही सत्कार मूर्तींची माहिती स्वतंत्रपणे दोन पोस्टमध्ये
देत आहे.
दोन्ही ज्येष्ठ रंगकर्मीचे रत्नागिरी मीडिया परिवाराकडून
विशेष अभिनंदन आणि शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी
माहिती स्त्रोत - अमेय धोपटकर , रत्नागिरी
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास
हरकत नाही.