आज मराठी रंगभूमी दिन -
दरवर्षी 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णूदास भावे यांनी 1843 साली
' सीता स्वयंवर ' हे पहिले नाटक रंगभूमीवर सदर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला.
1943 सालच्या या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील रंगभूमीवरील / क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला.
या निमित्ताने 5 नोव्हेंबर रोजी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापण्यात आली. चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णूदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यमंदिराची कोनशिला बसविण्यात आली.
या महत्त्वाच्या क्षणी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस ' मराठी रंगभूमी दिन ' म्हणून जाहीर केला.
मराठी रंगभूमी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
💐💐💐
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती स्रोत - इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून साभार.
माहिती नावासह Like , Share & Forward करण्यास हरकत नाही.