आज  - 07 ऑक्टोबर  - दि. 03 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र निमित्ताने  09 -  श्री देवीच्या मंदिरांची माहिती   -

आज  - 07 ऑक्टोबर  - 

 

नवरात्रोत्सव  - ०५

 

श्री दुर्गादेवी मुरुड, ता. दापोली जि. रत्नागिरी - 

 

दि. 03 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र निमित्ताने  09 -  श्री देवीच्या मंदिरांची माहिती   - 

 

दापोली हर्णे रस्त्यावर आसूद गाव गेल्यावर डाव्या बाजूस मुरुड गावाकडे जाणारा फाटा फुटतो,  तेथून सुमारे  2 किलोमीटर आत गेल्यावर श्री दुर्गामातेचे मंदिर दिसते. मंदिराच्या पाठीमागे साधारण 200 फुटावर विस्तीर्ण व सुंदर समुद्रकिनारा आहे. नारळी - पोफळीच्या बाग, घनदाट वृक्षराजी याने आजूबाजूचा परिसर अतिशय आल्हाददायक व रम्य वाटतो. 

इ. स. 1779 च्या दंग्यांमध्ये गुहागर व कोळथरे येथील मंदिरांचा नाश झाल्यावर पुण्याहून पद्माकरशास्त्री दातार यांनी एक संगमरवरी व एक काळ्या पाषाणाची अशा दोन मूर्ती आणून गुहागर येथे संगमरवरी व मुरुड येथे नवीन मंदिर बांधून काळ्या पाषाणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ही देवी अष्टभुजा आहे. मंदिराचे बांधकाम अतिशय सुबक आहे, मंदिराच्या समोर नगारखाना आहे. आणि शेजारीच दीपमाळ आहे. नगारखान्याचे खाली तुळशीवृंदावन आहे. मुरुड ग्रामस्थ ब्राह्मण सभेद्वारे या देवालयाची नित्य पूजा केली जाते. 

या देवस्थानचे प्रमुख उत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी (वासंतिक नवरात्र), आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसरा (शारदीय नवरात्र) यावेळी केले जातात. यावेळी सप्तशतीपाठ व हवन , श्री सुक्ताभिषेक, आरत्या, देवे व इतर भजन कीर्तनाचा कार्यक्रम मुरुड ब्राम्हण सभेद्वारे साजरे केले जातात. 

 

सदर माहिती अजित पटवर्धन यांच्या  ' कुलदैवत ' या पुस्तकावरून साभार. 

 

माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे रत्नागिरी.

माहिती नावासह Like,  Share  & Forward  करण्यास हरकत नाही.