आज  - 06 ऑक्टोबर  -  नवरात्रोत्सव  - ०४ श्री करंजेश्वरी गोवळकोट ता. चिपळूण जि. रत्नागिरी

आज  - 06 ऑक्टोबर  - 

 

नवरात्रोत्सव  - ०४

 

श्री करंजेश्वरी गोवळकोट ता. चिपळूण जि. रत्नागिरी 

 

दि. 03 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र निमित्ताने  09 -  श्री देवीच्या मंदिरांची माहिती   - 

 

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण बसस्थानकापासून अंदाजे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी श्री देवी करंजेश्वरी मंदिर आहे. पटवर्धन घराण्यातील एका स्त्रीच्या स्वप्नात दृष्टांत देऊन श्री देवीने तिला सांगितले की, मी तुमच्या घराण्याची कुलस्वामिनी अमुक ठिकाणी करंजीच्या झाडाखाली आहे . तर तू येथे हळद कुंकू घेऊन माझ्या दर्शनासाठी ये . दुसऱ्या दिवशी इतर लोकांबरोबर ही स्त्री त्या ठिकाणी गेली व करंजीच्या झाडाखाली खोदले असता त्यांना श्री देवीची चतुर्भुज मूर्ती सापडली. 

त्या देवीची भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा करून पूजन केले व तेव्हापासून करंजीच्या झाडाखाली स्थित असलेल्या देवीचे नाव श्रीदेवी करंजेश्वरी ठेवले व पटवर्धन कुटुंबियांची ही कुलस्वामिनी झाली . 

श्री देवी करंजेश्वरी ही चतुर्भुज असून तिचे एका हातामध्ये तलवार दुसऱ्या हातामध्ये ढाल , तिसरे हातामध्ये हळदीकुंकू असून चौथ्या हाताने भक्तजनांना आशिर्वाद देते.

या मंदिराची स्थापना सुमारे तीनशे वर्षांपूर्वी झाली. श्रीदेवीच्या मूर्तीच्या समोरच श्रीदेव सोमेश्वराची स्वयंभू मूर्ती आहे. उजव्या बाजूस श्री गणपतीची मूर्ती आहे. 

या देवस्थानचे वार्षिक उत्सव हे शारदीय नवरात्र , कार्तिक शुद्ध प्रतिपदा व फाल्गुन शुद्ध त्रयोदशीपासून होळी पौर्णिमेपर्यंत असतात. यावेळी सप्तशतीपाठ, भजन, कीर्तन असे कार्यक्रम असतात. 

या मंदिराच्या पिछाडीस गोवळकोट किल्ला असून सुमारे तीनशे पायऱ्या चढून वर गेले असता किल्ल्याची तटबंदी व तोफा पहाता येतात. वरती एक तळे असून पावसाळ्यातच फक्त ते भरलेले असते. 

येथून सुमारे 4 कि मी अंतरावर महेंद्रगड असून तेथे श्री भगवान परशुरामाचे सुरेख मंदिर आहे. तसेच रावतळे येथील श्री विंध्यवासिनी देवीचे मंदिर 3 कि मी अंतरावर असणारे सुंदर मंदिर आहे. 

 

सदरची माहिती - '  कुलदैवत  ' या अजित पटवर्धनांनी लिहिलेल्या पुस्तकातून साभार . 

 

माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.

माहिती नावासह Like,  Share  & Forward  करण्यास हरकत नाही.