आज - 21 डिसेंबर - रत्नागिरीतील गोगटे - जोगळेकर महाविद्यालया चा वार्षिक "झेप 2024" महोत्सव -

आज  - 21 डिसेंबर  - 

 

रत्नागिरीतील गोगटे - जोगळेकर महाविद्यालया चा वार्षिक 

 'झेप 2024'   महोत्सव - 

 

🔴  गोगटे - जोगळेकर महाविद्यालय माझे प्रेरणादायी 

ठिकाण आहे. - अभिनेता रोहित शिवलकर 

 

गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात 'झेप 2024' या 

वार्षिक महोत्सवामध्ये टीव्ही मालिकांमध्ये लीड रोल 

मिळणारे कोकणातील पहिले कलाकार, अभिनेते रोहित शिवलकर उपस्थित होते. यावेळी  बोलताना स्वतःच्या कॉलेजमध्ये येऊन अतिशय आनंद झाल्याचे नमूद करून याठिकाणीच आपण अभिनयाचे धडे गिरवले असे आवर्जून सांगितले. पुरुषोत्तम करंडकसाठी ' हिय्या ' या  

एकांकिकेसाठी रिप्लेसमेंट कलाकार म्हणून कला सादर करण्याची संधी मिळाली. नंतर कधीच मागे वळून पहिले 

नाही कारण गोगटेच्या टीममध्ये येणेच हे मोठे कठीण काम 

आहे. मी जेव्हा शूटिंगच्या युनिटवर असतो तेव्हा मी गोगटेचा विद्यार्थी म्हणून आदराने पाहिले जाते असे रोहित  यांनी  

अतिशय नम्रपणे सांगितले.

18 व  19 डिसेंबर, 2024 रोजी साजरा झालेल्या या झेप महोत्सवाचे उदघाटन 18 रोजी झाले. उद्घाटन सोहळ्याला 

प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी 

उमेश लोवलेकर, सचिन वहाळकर, उपप्राचार्य (विज्ञान) 

डॉ. अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्य (वाणिज्य) डॉ. सीमा 

कदम, उपप्राचार्य (कला) डॉ. चित्रा गोस्वामी  आणि 

सांस्कृतिक प्रमुख डॉ. आनंद आंबेकर सर उपस्थित होते.

 

19 डिसेंबर रोजी झेप महोत्सवाचे वैशिष्ट्य - 

● विविध उद्योजकतेच्या स्टॉल्सचे उद्घाटन, ज्यामध्ये अन्न, उत्पादन, सेवा या क्षेत्रातील स्टॉल्सचा समावेश होता. त्याचबरोबर फाईन आर्ट प्रदर्शनाचे उद्घाटनही झाले, ज्यामध्ये फोटोग्राफी, मंडळा आर्ट, कॅलिग्राफी, हस्तकला, तसेच एआय-जनरेटेड क्रिएटिव्ह आर्टचा समावेश होता.

● साहित्य कला स्पर्धांची रंगतदार सुरुवात:

साहित्यकलेच्या विभागातील कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये नवीन उमेद निर्माण केली. निबंधलेखन, कविता, वाद-विवाद, कथा लेखन, भाषण, आणि प्रश्नमंजूषा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. परीक्षक म्हणून प्राध्यापक निधी पटवर्धन आणि प्राध्यापक स्वराली शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन केले व प्रेरणादायी भाषण दिले.

● रंगभूमीवरील सादरीकरणे:

थिएटर कार्यक्रमांमध्ये एकपात्री अभिनय, द्विपात्री, स्किट, स्टँडअप कॉमेडी, रील आणि लघुपट या स्पर्धांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. 

● दांडेकर मानचिन्ह एकपात्री अभिनय स्पर्धा

दांडेकर मानचिन्ह एकपात्री अभिनय स्पर्धा पार पडली. कौशल्य मोहिते विजयी झाला. परीक्षक म्हणून समीर इंदुलकर, सतीश दळवी उपस्थित होते स्किटसाठी श्रीकांत भाटवडेकर आणि शुभम  आंब्रे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले सर्व विद्यार्थ्यांचे अभिनेता रोहित शिवलकर आणि प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर यांनी अभिनंदन केले.

● झेप 2024 चे मुख्य आकर्षण - ‘गोगेट्स बेस्ट परफॉर्मन्सेस’:

या खास कार्यक्रमात झोनल, विद्यापीठ आणि राज्यस्तरीय मंचांवर झळकलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोहित शिवलकर (मालिका 'प्रेमाचं रंग' – सन मराठी, 'कन्यादान', आणि नाटक 'यादाकदाचित रिटर्न्स' फेम) यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

 

● नृत्य उत्सवाने समारोप:

समारोपाच्या दिवशी नृत्य स्पर्धांनी महोत्सवाला रंगत आणली. यामध्ये सोलो, गट नृत्य, लोकनृत्य, आणि वेस्टर्न डान्स या प्रकारांचा समावेश होता. परीक्षक म्हणून गौरव बंडबे (आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक विजेते लोकनृत्य कलाकार), गौरी साबळे आणि शुभम रसाळ यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

 

'झेप 2024' चा हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देणारा व सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

झेप महोत्सव समन्वयक डॉ आनंद आंबेकर, विद्यार्थी सचिव मिहिका केनवडेकर आणि कोअर कमिटी आणि विद्यार्थी मंडळ खूप मेहनत घेतली आहे.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी  कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सह कार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगिकर, प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.चित्रा गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.सीमा कदम उपस्थित होते. 

 

माहिती  संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी 

माहिती स्त्रोत  - प्रा. डॉ.  आनंद आंबेकर सर,  रत्नागिरी 

माहिती नावासह Like,  Share  & Forward  करण्यास हरकत नाही.