अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा रत्नागिरीने आयोजित केलेल्या कै.नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांच्या स्पर्धे चा मान्यवर रंगाकर्मींच्या उपस्थिती मध्ये शानदार शुभारंभ -
कै. रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांच्या स्पर्धेचे काल म्हणजे 16 / 11 / 2024 रोजी रात्री मौजे गोळप येथील श्री देव हरिहरेश्वर देवस्थानाच्या मंचावर उद्घाटन झाले.
या प्रसंगी स्पर्धेचे आयोजक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्याध्यक्ष समिरजी इंदुलकर, सनातनजी रेडीज, संतोष सनगरे, सुधाकर बेहेरे, दादा कदम, विजयजी पोकळे, सचिन काळे, दीपक माणगावकर, ऍड. रजनी सरदेसाई, सौ.पूर्णिमा साठे, अविनाश काळे, मनोहरजी जोशी, प्रदीपसर तेंडुलकर, बालरंगभूमी परिषद जिल्हाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर आणि नाटककार अमेय धोपटकर आदि उपस्थित होते.
काल उद्घाटनाचा प्रयोग सादरकर्त्यां संस्थेचे म्हणजे श्री. देव हरिहरेश्वर उत्सव मंडळाचे महेशजी जोशी आणि सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. नाटकाच्या लेखिका दिग्दर्शिका सौ.प्रज्ञा जोशी - रायकर आणि दोन्ही मान्यवर परीक्षक, श्रीकांतजी पाटील सर आणि सौ.अनुया बाम मॅडम देखील मंचावर उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन कार्याध्यक्ष समिरजी इंदुलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.सहकार्यवाह अमेय धोपटकर यांनी स्पर्धेचे उद्दिष्ट, हेतू,आणि स्वरूप प्रास्ताविकामधून मांडले. तर सर्व मान्यवरांनी नाट्य प्रयोगासाठी शुभेच्छा दिल्या. नाट्यपरिषदेच्या वतीने सौ.अनुया बाम यांनी नाटककार सौ. प्रज्ञा रायकर - जोशी यांनी उत्सवासाठी नवे कोरे नाटक लिहिल्याबद्दल गुलाबपुष्प देऊन कौतुक केले.
या प्रसंगी समिरजी इंदुलकर यांनी स्पर्धा उद्घाटनाचा उद्घोषणा करत कै. रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांच्या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल श्री देव हरिहरेश्वर नाट्यमंडळाला सहभागाचे मानचिन्ह सन्मानपूर्वक बहाल केले. याप्रसंगी उत्सव मंडळानेही इंदुलकर यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तर, दोन्ही मान्यवर परिक्षकांचाही सन्मान केला. मंडळाचे अध्यक्ष महेशजी जोशी यांनी नाट्य परिषदेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल नाट्यपरिषदेचे आभार मानले आणि सदिच्छा जाहीर केल्या.
तद्नंतर नाट्यप्रयोग सादर झाला आणि उत्तरोत्तर रंगात गेला.सर्व सहभागी कलाकार तंत्रज्ञ आणि पडद्यामागच्या चमुला नाट्य परिषदेच्या वतीने सहभागाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आले.
विशेष म्हणजे या सर्व उत्सवी रंगाकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरीतील मान्यवर रंगाकर्मीं भाग्येशजी खरे, गोपाळजी जोशी, सचिन काळे, आदींनी उपस्थिती लावली आणि नाटकाची पर्यायाने स्पर्धेची शोभा वाढविली.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा रत्नागिरीने आयोजित केलेल्या कै.नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांच्या स्पर्धेला रत्नागिरी मीडिया परिवाराकडून अनेक शुभेच्छा
🌹🌹🌹🌹🌹
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी
माहिती स्त्रोत - अमेय धोपटकर, रत्नागिरी
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.