आज - 15 डिसेंबर - गणपतीपुळे, रत्नागिरी येथील प्राचीन कोकण संग्रहालय आज 15 डिसेंबर रोजी करणार 21 - व्या वर्षात पदार्पण

आज - 15 डिसेंबर  - 

 

गणपतीपुळे, रत्नागिरी येथील  प्राचीन कोकण संग्रहालय 

आज 15  डिसेंबर रोजी करणार 21 - व्या वर्षात पदार्पण

 

रत्नागिरी  तालुक्यातील गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण संग्रहालयाला आज 15 डिसेंबर, 2022  रोजी 20 वर्षे पूर्ण 

करुन 21 - व्या वर्षात पदार्पण करत आहे. 

सन 2004 मध्ये वैभव सरदेसाई यांच्या संकल्पनेतून या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली. तत्कालिन 

जिल्हाधिकारी संतोष कुमार यांच्या हस्ते या संग्रहालयाचे 

उद्‌घाटन करण्यात आले. या संग्रहालयासाठी वामन 

बापट यांनी आपली जागा उपलब्ध करून दिली आहे. 

बापट स्वतः वृक्षप्रेमी असून त्यांचे प्राचीन कोकण 

संग्रहालयासाठी वेळोवेळी सहकार्य लाभते असे  वैभव 

सरदेसाई यांनी सांगितले. वर्धापन दिनी प्राचीन कोकण 

येथे प्रतिवर्षाप्रमाणे पर्यटकांचे स्वागत केले जाणार आहे. 

 

प्राचीन कोकण हे एक वैशिष्ट्यपूर्ण दालन असून 

महाराष्ट्रातील पहिले ओपन एअर संग्रहालय आहे. 

गणपतीपुळे येथील तीन एकर परिसरामध्ये 500 

वर्षांपूर्वीच्या कोकणची समाजरचना, व्यवसाय, 

वेषभूषा, परंपरा, इतिहास यांचे दर्शन घडविणारे संपूर्ण 

खेडेगावच निर्माण करण्यात आले आहे. तसेच यामध्ये 

100 पेक्षा जास्त प्रकारचे औषधी वृक्ष, नक्षत्र बाग,

स्पाईस गार्डनदेखील आहे. जांभ्या दगडाची पुरातन 

पाखाडी वेड्या वाकड्या वळणांची लाल मातीच्या 

पायवाटेवरून व सोबत झूळू झूळू वहाणारा 

पाटाच्या पाण्याचे संगीत ऐकत पर्यटक संग्रहालयाने 

पुरविलेल्या स्वागतिकेसोबत गावात फेरफटका मारतात.

 

●20 - व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्राचिन कोकण म्युझीयम मध्ये 'कोकण चित्र ' प्रदर्शन तयार करण्यात 

आले आहे. यामध्ये 2 फुट x 3 फुटच्या पेंटींग पासून 4 

फूट x 8 फुट अशा भव्य चित्रांचा समावेश आहे. या 

चित्रांमधून कोकणचे सण, समारंभ, चित्रकथ सारख्या 

पारंपरिक कला, व्यवसाय यांचे सुंदर दर्शन घडविले 

आहे.  सिंधुदुर्गमधील प्रसिद्ध चित्रकार वेंगुर्लेकर आणि 

मंडणगड, रत्नागिरी येथील चित्रकार प्रणव फराटे यांनी 

ही चित्रे साकारली आहेत. पर्यटकांसाठी हे प्रदर्शन 

आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. ●

 

प्राचीन कोकणमध्ये सागरामध्ये सापडणाऱ्या 160 पेक्षा 

जास्त प्रकारच्या शंखांचे प्रदर्शन हे पर्यटकांचे प्रमुख 

आकर्षण आहे. 

वेगळेपण जपून ठेवल्यामुळेच प्राचीन कोकण 

संग्रहालयाची दखल आज विविध क्षेत्रातून घेतली गेली 

आहे / जात आहे. 

या कामाची पोच म्हणून सन 2012 साली तत्कालीन 

गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्राचीन कोकणच्या व्यवस्थापिका सौ. स्वरुपा सरदेसाई यांना उद्योगिनी 

पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर वैभव सरदेसाई 

यांना पोलादी पुरुष पुरस्कार मिळाला आहे. नुकताच 

सन  2022 मध्ये बिझनेस आयकाॅन पुरस्कारने 

गौरवण्यात आले आहे.

 

प्राचीन कोकण संग्रहालयाच्या वर्धापन दिनाला रत्नागिरी 

मिडीया परिवाराकडून अनेक शुभेच्छा 

🌹🌹🙏🙏🌹🌹

 

माहिती संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी. 

माहिती स्त्रोत  - वैभव सरदेसाई, गणपतीपुळे. 

माहिती नावासह Like, Share  & Forward करण्यास हरकत नाही.