|| श्री ||
सिंधुदुर्ग जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2022 कोल्हापूर येथील शिवाजी भोसले प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेत बांदा केंद्र शाळा क्र. 1 मधील तिसरी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने बालगटातून द्वितीय क्रमांक मिळवला.
2022 कोल्हापूर येथील शिवाजी भोसले प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेत खुल्या गटात बांदा येथील सौ. गौरी नितीन बांदेकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
2022 किल्ले सिंधुदुर्गचा 356 -वा वर्धापन दिन साजरा. यानिमित्त मोरयाचा धोंडा येथे गणेश पूजन व किल्ले सिंधुदुर्गात श्री शिवराजेश्वर मंदिरात पूजा अर्चा करण्यात आली.
2022 कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराणी ताराराणी सामाजिक विचार संमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैशाली प्रभू खानोलकर यांना पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र उत्कृष्ट समाज पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अखिल दशावतारी पारंपरिक लोककला अकादमी आणि एशिया बुक रेकॉर्ड पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार देण्यात आले.
2022 कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराणी ताराराणी सामाजिक विचार संमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुरूकृपा कैनिंग इंडस्ट्रीजचे मालक शिवराम अंकुश वारंग (जांभरमळा) यांना कैनिंग उद्योग क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र समाज परिवर्तन उद्योग सेवा पुरस्कारज्येष्ठ अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अखिल दशावतारी पारंपरिक लोककला अकादमी आणि एशिया बुक रेकॉर्ड पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार देण्यात आले.
2022 कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराणी ताराराणी सामाजिक विचार संमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्नेहा मिलिंद दळवी (वेताळबांबर्डे) यांना ग्रामीण भागात बचत गट स्थापन करून चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल महाराष्ट्र सामाजिक सेवा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अखिल दशावतारी पारंपरिक लोककला अकादमी आणि एशिया बुक रेकॉर्ड पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार देण्यात आले.
2022 कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराणी ताराराणी सामाजिक विचार संमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धोंडू माणगावकर यांना कृषि क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र कृषि परिवर्तन सेवा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अखिल दशावतारी पारंपरिक लोककला अकादमी आणि एशिया बुक रेकॉर्ड पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार देण्यात आले.