|| श्री ||
आज - 13 एप्रिल -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
1987 ' मालवण समुद्री अभयारण्य ' - भारतातील तिसरे तर महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान म्हणून मालवण शहराजवळील समुद्र किनाऱ्यावरील जैविक विविधतेचे रक्षण करण्यासाठी हा भाग महाराष्ट्र सरकारने सागरी अभयारण्य म्हणून घोषित केले.
2012 ' मालवण समुद्री अभयारण्य ' - भारतातील तिसरे तर महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान म्हणून मालवण शहराजवळील समुद्र किनाऱ्यावरील जैविक विविधतेचे रक्षण करण्यासाठी हा भाग महाराष्ट्र सरकारने सागरी अभयारण्य म्हणून घोषित केले. या सागरी अभयारण्याला 25 - वर्षे पूर्ण झाली.
2019 कै. नरहरी (बाब्या) पांढरे मित्र मंडळ, आजगाव ता. सावंतवाडी यांच्या विद्यमाने 12 व 13 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच IPL च्या धर्तीवर ' आजगाव प्रीमियर लीग शूटींग बाॅल कुंभमेळा, 2019 चे आयोजन जिल्ह्यात प्रथमच करण्यात आले. जिल्ह्य़ातील 64 + खेळाडूंचा 08 संघात समावेश करण्यात आला होता.