|| श्री ||
● जागतिक वारसा दिन
● जागतिक हॅम रेडिओ दिवस
रत्नागिरी जिल्ह्यात-
घडलेल्या महत्वाच्या घटना-
2017 मुंबई विद्यापीठाच्या 57 किलो वजनी गटात रत्नागिरीची पॉवर लिफ्टर नेहा राजेश नेने ब्रॉंझ पदकाची मानकरी.
2019 राजापूर येथील गंगेचे आगमन.
2022 रीगल एज्युकेशन सोसायटी चिपळूणच्यावतीन देण्यात येणारा कोकण रत्न पुरस्कार आडिवरे ता. राजापूर येथील एकमेव ऑर्गन निर्माते उमाशंकर दाते यांना केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते एका कार्यक्रमात देण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.
2022 रीगल एज्युकेशन सोसायटी चिपळूणच्यावतीने देण्यात येणारा कोकण रत्न पुरस्कार चिपळूण येथील पर्यावरणस्नेही भाऊ काटदरे यांना केंद्रीयमंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते एका कार्यक्रमात देण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती /संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.
2022 रीगल एज्युकेशन सोसायटी चिपळूणच्यावतीन देण्यात येणारा कोकण रत्न पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल सुनील मोकल यांना केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते एका कार्यक्रमात देण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती /संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.
2022 रीगल एज्युकेशन सोसायटी चिपळूणच्यावतीने देण्यात येणारा कोकण रत्न पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल माहेर या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते एका कार्यक्रमात देण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1858 भारतरत्न महर्षि धोंडो केशव कर्वे यांचा मुरुड ता.दापोली येथे जन्म. (मृत्यू- 09 नोव्हेंबर, 1962).
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1886 कवी, कथालेखक, भाषांतरकार बजावा रामचंद्र प्रधान यांचे निधन. (जन्म - तारीखअनुपलब्ध - एप्रिल, 1838) (जन्म - दापोली).
1972 भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे निधन.
(जन्म - 07 मे, 1880) (जन्म- पेढे परशुराम ता. चिपळूण).