आज 14 एप्रिल रत्नागिरी जिल्हा दिनविशेष -

|| श्री ||

 

आज  14  एप्रिल  -  

 

रत्नागिरी जिल्ह्यात- 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना- 

 

1858  चिपळूण नगर परिषदेची स्थापना. पहिले नगराध्यक्ष कै. रंगनाथ बापूजी पत्की.

 

1929  खोतीविरुद्ध शेतकरी परिषदेला डॉ. बाबासाहेब

आंबेडकर उपस्थित होते. 

 

1972   रत्नागिरी जिल्ह्याचे  19 - वे  जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून के. एम्. सिंग यांनी पदभार स्वीकारला.  

 

2001  खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 42  वी मासिक संगीत सभा पुणे येथील कलाकार सौ. श्वेता दातार यांच्या गायनाने पार पडली. 

 

2007  खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 114 वी मासिक संगीत सभा दापोली येथील कलाकार संदीप आपटे यांच्या सतार वादनाने पार पडली. 

 

2012  खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 174  वी मासिक संगीत सभा दापोली येथील कलाकार अमेय आखवे यांच्या गायनाने तर याच संगीत सभेत मुंबई येथील कलाकार जयंत फडके यांनी सादर केलेल्या हार्मोनियम वादनाने पार पडली. 

 

2018  खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 246  वी मासिक संगीत सभा पुणे येथील कलाकार सौ. माधवी केळकर यांच्या गायनाने पार पडली. 

 

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती - 

 

1891  घटनाकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर  तथा बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म.  

(मृत्यू- 06 डिसेंबर, 1956 ) 

(मूळगाव - आंबडवे ता. मंडणगड). 

 

1900  पुण्यातील महाराष्ट्र मंडळाचे संस्थापक कॅप्टन  शिवरामपंत दामले यांचा जन्म. 

(मूळगाव- कोळंबे ता. रत्नागिरी).

 

1960  रत्नागिरीतील ज्येष्ठ गिर्यारोहक,  रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या गिर्यारोहणातील संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष,  ग्रंथप्रेमी, रत्नागिरीतील जलपर्यटनाचे पायोनियर, सामाजिक कार्यकर्ते, उच्चशिक्षित संजीव नरसिंह लिमये यांचा जन्म.  

 

1995   दापोलीतील आघाडीची गायिका प्रियांका दाबके - बापट यांचा दापोली येथे  जन्म. 

 

निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

2004  विद्या प्रसारक मंडळ ठाणे या संस्थेचे दीर्घकालीन  अध्यक्ष, भारत बॅन्केचे संस्थापक अध्यक्ष डॉ.  वा. ना. बेडेकर  यांचे निधन.  

(जन्म - 15 फेब्रुवारी, 1916)

(जन्म - गोवळ, ता. राजापूर).