आज 16 एप्रिल - ठाणे जिल्हा दिनविशेष

|| श्री || 

 

ठाणे जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

1853 बोरीबंदर (आताचे CSMT), मुंबई ते ठाणे या पहिल्या प्रवासी रेल्वेचे उदघाटन आजच्या दिवशी म्हणजेच 16 एप्रिल रोजी दुपारी 03-35 वाजता 21 तोफांच्या सलामीने झाले. या रेल्वेगाडीने पहिल्याच फेरीचे 33.8 किमीचे हे अंतर 01 तास 15 मिनिटांत पार करत पूर्ण केले. हा दिवस भारतीय रेल परिवहन दिवस ( Indian Railway Transport Day ) म्हणून साजरा केला जातो. 

 

निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती - 

 

1978 समीक्षक खंडेराव त्र्यंबक सुळे यांचे निधन.  

(जन्म - 12 डिसेंबर, 1904) (जन्म - ठाणे). 

 

1982 ठाणे येथील सौंदर्य प्रसाधने उत्पादक विश्वनाथ कृष्णाजी जोगळेकर ऊर्फ नाना जोगळेकर यांचे निधन.  

(जन्म - 12 डिसेंबर, 1912) (मूळगाव - हेदवी ता. गुहागर).