रत्नागिरी जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
1927 देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ,देवरुख या
शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
संस्थेची देवरुख ता. संगमेश्वर येथे स्थापना.
1952 देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ,देवरुख या
शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या
देवरुख ता. संगमेश्वर येथे स्थापनेला 25 - वर्षे पूर्ण.
1977 देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ,देवरुख या
शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या
देवरुख ता. संगमेश्वर येथील स्थापनेला 50 - वर्षे पूर्ण.
1997 वैदिक शिक्षण देणारी श्री गणेश वेदपाठशाळा,
देवरुख या संस्थेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन.
2001 तामिळनाडू असोसिएशन ऑफ इंडियन
युनिव्हर्सिटीज तर्फे आयोजित आंतर विद्यापीठ महिला
क्रिकेट स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा महिला क्रिकेट संघ
विजेता ठरला. या विजेत्या संघात रत्नागिरीची क्रिकेटपटू
योगिता महाकाळ यांचा समावेश होता.
2002 देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ,देवरुख या
शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या
देवरुख ता. संगमेश्वर येथील स्थापनेला 75 - वर्षे पूर्ण.
2007 ज्ञानप्रबोधिनी,निगडी,पुणे या संस्थेने आयोजित
केलेल्या राज्यस्तरीय सूर्यनमस्कार व योगासन स्पर्धेत रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेतील गुरूकुलच्या
विद्यार्थ्यांचे 5- वी ते 7- वी गटात प्रथम क्रमांक अक्षय
अवेरे याने मिळवला.
2007 ज्ञानप्रबोधिनी,निगडी,पुणे या संस्थेने आयोजित
केलेल्या राज्यस्तरीय सूर्यनमस्कार व योगासन स्पर्धेत रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेतील गुरूकुलच्या
विद्यार्थ्यांचे 5- वी ते 7- वी गटात प्रथम क्रमांक कु.
देवश्री शिन्दे हिने मिळवला.
2007 ज्ञानप्रबोधिनी,निगडी,पुणे या संस्थेने आयोजित
केलेल्या राज्यस्तरीय सूर्यनमस्कार व योगासन स्पर्धेत रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेतील गुरूकुलच्या
विद्यार्थ्यांचे 5- वी ते 7- वी गटात प्रथम क्रमांक कदम
अक्षय माने याने मिळवला.
2020 कालुस्ते ता. चिपळूणचे सुपुत्र क्रिकेटपटू
झुल्फिकार परकार यांची मुंबई क्रिकेट
असोसिएशनच्या रणजी संघ समितीवर निवड.
2022 रत्नागिरी शहराच्या विकासातील एक मैलाचा
दगड मानले गेलेले तसेच पर्यटन दृष्ट्याही महत्वाचे ठरलेले
' हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण ' या
तारांगणाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.
एकनाथ राव शिंदे यांच्यी हस्ते झाले.
रत्नागिरी येथे इन्फोव्हीजन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. ने या
सुसज्ज तारांगणाच्या उभारणीत महत्वाचा वाटा उचलला
आहे. भारतात आजवर 50 हून अधिक तारांगणे
उभारण्यात आली आहेत. देशातील पहिले डिजिटल
तारांगण मुंबईत नेहरु तारांगण ठरले. तर देशातील पहिले डिजिटल 3D स्वामी विवेकानंद तारांगण आहे हे मंगलोर
येथे आहे. रत्नागिरीत आकारास आलेले 3-D तारांगण
देशातील या स्वरुपाचे पाचवे तारांगण आहे.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1968 कीर्तनकार महेश बुवा काणे यांचा खेड येथे जन्म.
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1948 दिग्दर्शक,छायाचित्रकार दत्तात्रेय महादेव दाबके
यांचे निधन .
(जन्मतारीख उपलब्ध नाही सन 1885 ).
(मूळगाव - आसूद ता. दापोली ).
1972 महाराष्ट्राच्या आधुनिक काळातील कला परंपरेची
ओळख करून देणारे संग्रहालय कोकणात रत्नागिरीत
व्हावे यासाठी प्रयत्न करणारे एक चित्रकला शिक्षक
शांताराम यशवंत मुळ्ये ऊर्फ मुळ्ये मास्तर यांचे निधन.
(जन्म - 01 जानेवारी, 1897).
(जन्म - ओझरखोल ता. संगमेश्वर).
2004 रत्नागिरीचे सुपुत्र हास्यसम्राट,प्रसिद्ध विनोदी
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन.
(जन्म- 26 ऑक्टोबर, 1954)
(जन्म- रत्नागिरी).
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com