आज 15 डिसेंबर - रत्नागिरी जिल्हा दिनविशेष -

● जागतिक चहा दिवस. 

 

रत्नागिरी जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2004  गणपतीपुळे, रत्नागिरी येथील प्राचीन कोकण

संग्रहालय या वैशिष्टय़पूर्ण दालनाचे  जिल्हाधिकारी संतोष 

कुमार यांच्या हस्ते उदघाटन.  

 

2009  चेतना फाउंडेशन या सामाजिक संस्थेची चिपळूण 

येथे स्थापना. 

 

2016   रत्नागिरी येथे बंदिवासात असलेला  ब्रम्हदेशचा

 राजा थिबा याच्या 100 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून  म्यानमार पूर्वीच्या ब्रम्हदेशाचे उपराष्ट्रपती यू मंत स्यू व 

सैन्यदल प्रमुख मीन हाँग अलाईंग यांनी ब्रिटिश सरकारने 

थिबा राजाला ज्याठिकाणी रत्नागिरी येथे बंदिवासात 

ठेवण्यात आले होते त्या ऐतिहासिक थिबा राजवाड्याला 

भेट दिली. 

 

2016   रत्नागिरी येथे बंदिवासात असलेला  ब्रम्हदेशचा

राजा थिबा याच्या 100 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून  म्यानमार पूर्वीच्या ब्रम्हदेशाचे उपराष्ट्रपती यू मंत स्यू व 

सैन्यदल प्रमुख मीन हाँग अलाईंग यांनी रत्नागिरी येथील 

थिबा राजाच्या समाधीला भेट दिली. 

 

2016  रत्नागिरी येथे बंदिवासात असलेला  ब्रम्हदेशचा

राजा थिबा याच्या 100 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून  म्यानमार पूर्वीच्या ब्रम्हदेशाचे उपराष्ट्रपती यू मंत स्यू व 

सैन्यदल प्रमुख मीन हाँग अलाईंग यांनी थिबा राजाच्या 

वंशजांची  रत्नागिरी येथे  भेट घेतली. 

 

2018  15 नोव्हेंबर  ते 27 नोव्हेंबर या कालावधीसाठी 58 - वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा प्राथमिक केंद्र रत्नागिरीतील स्वा. वि. दा.  सावरकर नाट्यगृहात आयोजन.  

 

2020  सिंधुदुर्गातील साहित्यिकांची माहिती देणारे

सिंधुसाहित्य सरिता हे पत्रकार प्रमोद कोनकर यांनी 

लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन सत्वश्री प्रकाशनतर्फे 

करण्यात आले. 

 

2021  लांजा येथील शिक्षक, ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, 

दिग्दर्शक राजेश जगन्नाथ गोसावी यांच्या 'माझ्या

अंगणी नाचते दुसऱ्याची बायको ' या दोन अंकी नाट्यकलाकृतीच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

कोमसापचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री 

मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते कवी केशवसुत स्मारक, 

मालगुंड ता. रत्नागिरी येथे  पार पडला. पुस्तकाचे 

प्रकाशक अमेय जोशी, अक्षर प्रकाशन, कोल्हापूर हे आहेत. 

 

2021  कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे रत्नागिरी  येथील निवृत्त प्राथमिक शिक्षिका सौ. वैजयंती  कृ. आ. पाटील यांचा 

' वैजयंती - गौरव ग्रंथ '  या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.  ह्या गौरवग्रंथाचे प्रकाशन कोकण मराठी साहित्य 

परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू 

मंगेश कर्णिक यांच्या हस्ते मालगुंड  येथे कवी केशवसुत स्मरकामध्ये पार पडले. या पुस्तकाचे प्रकाशक ज्येष्ठ निवृत्त शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते विनायक हातखंबकर हे 

असून पुस्तकाचे संपादन रा. भा. शिर्के प्रशालेचे

पर्यवेक्षक नथुराम देवळेकरसर यांनी केले आहे. 

 

2022  राजापूर हायस्कूल व गोडे ज्युनिअर कॉलेज राजापूर च्या राजापूर हायस्कूल अटल लॅबमधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय रोबोटिक्स स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला. 

 

2022   डाॅ . बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 50 - वी संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठक,  2022 चा उदघाटन समारंभ राज्याचे कृषीमंत्री तथा प्रति उपकुलपती अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात झाला. याप्रसंगी चारही कृषी विद्यापीठातील उत्कृष्ट कृषी संशोधन केलेल्या संशोधकांना कृषी संशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी डाॅ . बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे कार्यरत असलेले  डॉ. रमेश कुणकेरकर , प्रमुख कृषी वनस्पतीशास्त्र विभाग यांनी केलेल्या भरीव संशोधनाबद्दल उत्कृष्ट कृषी संशोधक म्हणून सन्मानित करण्यात आले. डाॅ . कुणकेरकर हे  गेली 28 - वर्षे विद्यापीठाच्या अविरत सेवेत असून त्यांनी भात, वरी , नाचणी, भुईमूग यामध्ये उल्लेखनीय संशोधन कार्य केले आहे. 

 

 जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती - 

 

1903  अध्यात्मिक गुरू,  पावसचे संत स्वामी स्वरूपानंद

यांचा (तारखेने) पावस ता. रत्नागिरी येथे जन्म.

(महासमाधी - 15 ऑगस्ट, 1974 ). 

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com