आज 11 डिसेंबर - रत्नागिरी जिल्हा दिनविशेष -

रत्नागिरी जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

1967  कोयनेला पहाटे 04 वाजता भूकंपाचा 6.3 रिष्टर

महत्तेचा धक्का बसला.  

 

1999  खलवायन, रत्नागिरी या संस्थेच्या 26 व्या मासिक 

संगीत सभेत मुंबई येथील कलाकार सौ. प्रतिभा देऊसकर 

यांच्या गायनाने पार पडली.   

 

2004  खलवायन, रत्नागिरी या संस्थेच्या 86 व्या  मासिक संगीत सभेत पुणे येथील कलाकार कु. वर्षा विनायक 

कुलकर्णी यांच्या गायनाने पार पडली.   

 

2006  शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथे आयोजित रणजी 

ट्रॉफी सुपरलीगमधल्या महाराष्ट्र राजस्थान संघादरम्याने 

खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात महाराष्ट्र संघाने राजस्थान संघावर 1 डाव 250  धावांनी विजय मिळवला. अंतिम 

धावफलक -

महाराष्ट्र - 527 / 5 बाद घोषित. 

राजस्थान - पहिला डाव  86 व दुसरा डाव 191 सर्वबाद. 

 

2010  खलवायन, रत्नागिरी या संस्थेच्या 158 व्या मासिक संगीत सभेत मुंबई येथील कलाकार सौ. सुनिता भावसार - 

टिकारे यांच्या गायनाने पार पडली.  

 

2014  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिपत्याखाली असलेल्या रत्नागिरी येथील मत्स्यालयाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण.

 

2017  रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय संचलित श्रीमान

 गंगाधरभाऊ पटवर्धन स्मृती ग्रंथालयाची सुरुवात. 

 

2019  रत्नागिरी जिल्हा परिषदेचे 37 वे मुख्य कार्यकारी

अधिकारी म्हणून कान्हूराज बगाटे यांनी पदभार स्वीकारला. 

 

2019  अभिजित पांचाळ यांच्या ' अभिज कॅरम हाऊस '

या कॅरम क्लबची स्थापना. 

 

2019  जागतिक दिव्यांग दिन सप्ताहानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील पेण येथे आयोजित दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या संघाचे नेतृत्व चिपळूणच्या मंदार खैर याने केले. 

 

2019  रत्नागिरीतील खो खो खेळाडू ऐश्वर्या सावंत व अपेक्षा सुतार या दोघींनी नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई (सैफ गेम) स्पर्धेत खो खो खेळासाठी भारतीय 

संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या दोघींनीही सुवर्ण पदकाची कमाई केली. 

 

2019  डेरवण येथील क्रीडा संकुलात क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय,  पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय फिल्ड आर्चरी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित सावर्डे येथील गोविंदराव निकम विद्यालयाच्या -01. सेजल चव्हाण,  02. रोहित चव्हाण, 

03.प्रदीप गुरव,  04. मृणाल सकपाळ या विद्यार्थ्यांनी इंडियन रिकव्हर व कंपाऊंड या इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता. चारही खेळाडूंनी आपापल्या इव्हेंट मध्ये उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक मिळवला. 

 

2021   खलवायन, रत्नागिरी या संस्थेच्या 273 व्या  मासिक संगीत सभेत रत्नागिरी येथील आघाडीचे गायक कलाकार  साईश आनंद प्रभुदेसाई  यांच्या गायनाने पार पडली.   

 

2022  रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाकडून दरवर्षी  विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पुरस्कारित केले जाते. संघातर्फे 

दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची अध्यक्ष माधव हिर्लेकर 

यांनी नुकतीच घोषणा केली होती त्यांचे वितरण आज पितांबरी 

या प्रथितयश उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते संघातर्फे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.  

या कार्यक्रमातील पुरस्कार्थी  - 

01) आदर्श कीर्तनकार पुरस्कार ह.भ.प. दत्तात्रेय तथा दत्तराज नरसिंह वाडदेकर (देवरुख), 

02) आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार सदानंद रघुनाथ ठाकुरदेसाई (मोरोशी, ता. राजापूर), 

03) आदर्श पौरोहित्य पुरस्कार वे. मू. गणेश दत्तात्रय खेर (भू, राजापूर), 

04)  धन्वंतरी पुरस्कार डॉ. शाम गोपाळराव जेवळीकर (रत्नागिरी), 

05) दर्पण पुरस्कार सुरेश वामन सप्रे (देवरुख), 

06)  उद्योजक पुरस्कार महेश मोहन गर्दे (रत्नागिरी), 

07) उद्योगिनी पुरस्कार शिल्पा नितीन करकरे (तुरळ, ता. संगमेश्वर)

08) राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार खो-खो पटू सायली दिलीप कर्लेकर (रत्नागिरी) 

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com