सिंधुदुर्ग जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2022 डाॅ . बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 50 - वी संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठक, 2022 चा उदघाटन समारंभ राज्याचे कृषीमंत्री तथा प्रति उपकुलपती अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात झाला. याप्रसंगी चारही कृषी विद्यापीठातील उत्कृष्ट कृषी संशोधन केलेल्या संशोधकांना कृषी संशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी डाॅ . बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे कार्यरत असलेले डॉ. रमेश कुणकेरकर , प्रमुख कृषी वनस्पतीशास्त्र विभाग यांनी केलेल्या भरीव संशोधनाबद्दल उत्कृष्ट कृषी संशोधक म्हणून सन्मानित करण्यात आले. डाॅ . कुणकेरकर हे गेली 28 - वर्षे विद्यापीठाच्या अविरत सेवेत असून त्यांनी भात, वरी , नाचणी, भुईमूग यामध्ये उल्लेखनीय संशोधन कार्य केले आहे.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1862 कवी विष्णू गणेश नेने यांचा देवगड तालुक्यातील पडेल येथे जन्म.
(मृत्यू - 23 जानेवारी , 1924).
1905 माजी केंद्रीय मंत्री व स्वातंत्र्य सैनिक र. के. खाडिलकर
यांचा देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे जन्म.
(मृत्यू - 12 फेब्रुवारी, 2015).
1935 1950 अणि 60 च्या दशकात गाजलेल्या उत्तम अभिनेत्री आणि उत्तम नर्तिका अभिनेत्री हिरा सावंत यांचा सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथे जन्म.
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com