ठाणे जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2014 गीतारहस्य ग्रंथावर शताब्दीनिमित्त व्याख्यान देण्यासाठी सार्वजनिक वाचनालय, कल्याण येथे प्रसिद्ध ज्योतिषी व खगोल तज्ज्ञ दा. कृ. सोमण यांचे व्याख्यान.
2022 मागील 15 - वर्षांच्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा प्रभावी अवलंब करून 18 - कोटी युनिटची वीज बचत करणार्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचा शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर. याशिवाय पालिका रुग्णालयात उच्चतम दर्जेदार उर्जा कार्यक्षम सुविधा देऊन रूग्णसेवेत महत्वपूर्ण कामगिरी केल्याने रूग्णालय संवर्गातही पालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला . महाराष्ट्र शासनाच्या मेडा या समन्वयक एजन्सीमार्फत महापालिका विभाग, रूग्णालय विभागात केलेल्या उर्जा बचतीच्या उपाययोजना , राबविलेल्या उपक्रमांची माहिती उर्जा संवर्धन पुरस्कारासाठी मागविण्यात आली होती. या स्पर्धेत
राज्यातील महापालिका सहभागी झाल्या होत्या. हा 17 - वा उर्जा संवर्धन पुरस्कार आहे.
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com