आज - 13 डिसेंबर - ठाणे जिल्हा दिनविशेष -

ठाणे जिल्ह्यात - 



घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2021  मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेमार्फत देण्यात येणारा कै. वामन अनंत रेगे हा नामांकित पुरस्कार ठाण्यातील पत्रकार, साहित्यिक विनोद पितळे व लेखिका विद्या प्रभू यांना राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. केवळ ठाणे जिल्ह्यातील ललित व ललितेतर या विभागात हा पुरस्कार देण्यात येतो. ललित विभागात विनोद पितळे यांच्या ' काहीच्या बाही ' या  पुस्तकाला तर ललितेतर विभागात विद्या प्रभू यांच्या ' मालवणी वाक्प्रचार ' या पुस्तकाला हे पुरस्कार मिळाले. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. 

 

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

1917   ट्रान्सजेंडर  / हिजडा हक्क कार्यकर्ता , बाॅलीवूड अभिनेत्री, भरत नाट्यम् नृत्यांगना, कोरिओग्राफर तसेच, 

किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी ऊर्फ  लक्ष्मी यांचा ठाणे येथे जन्म.  

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com