आज  - 05 नोव्हेंबर  - रंगभूमी  दिन - ज्येष्ठ महिला रंगकर्मी श्रीम. शोभाताई वाडकर -

आज  - 05 नोव्हेंबर  - 

 

रंगभूमी  दिन - 

 

आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय 

नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेकडून यावर्षीचा रंगभूमी 

दिन इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे 

प्रतिवर्षीप्रमाणे सायंकाळी 05:30 वाजता साजरा होत 

आहे. 

या कार्यक्रमात चिपळूणमधील तीन ज्येष्ठ महिला 

रंगकर्मींचा सत्कार तसेच प्रकट मुलाखत असा कार्यक्रम 

नाट्य परिषद चिपळूण शाखेकडून ठरविण्यात आला आहे. त्याप्रमाणे यावर्षीचा ज्येष्ठ महिला रंगकर्मी सत्कारार्थी 

होण्याचा मान ज्येष्ठ महिला रंगकर्मी श्रीम. शोभाताई वाडकर  यांना मिळाला आहे.  

 

श्रीम. शोभाताई वाडकर यांचा अल्प परिचय  - 

शोभाताई यांची अभिनयाची सुरुवात शालेय  जीवनापासून. परक्याच धन या छोट्या नाटिकेतील अभिनयाने सुरुवात.  वामन भाई साडविलकर यांच्या राष्ट्र सेवा दलाच्या मेळ्यात सहभागी होवू लागल्या.  या मेळाव्याच्या माध्यमातून चिपळूण  - दापोली  - रत्नागिरी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात पथनाट्ये सादर होत असत. ही पथनाट्ये ' मुलगी शिकली हो  ' ' शिकाल तर टिकाल ' अशा विषयांवरील समाजोपयोगी पथनाट्ये असत.  

त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात प्रेमजीभाई आसर एकांकिका स्पर्धा खूप गाजवल्या.  ' संयम '; ' ककणेर ';  ' पारावरचे प्रेम ';  ह्या एकांकिका खूप गाजल्या. तसेच आंतरराष्ट्रीय वार्षिक चित्कार  त्या स्वतः व  दिलीप आंब्रे  ग्रुपने सादर केली.  हे सादरीकरण लक्षात राहण्याजोगे झाले.  

रंगभूमीवर अखेरचा सवाल या नाटकातील अभिनयाने पदार्पण केले.  दिवा जळू दे सारी रात,  देणाराचे हात हजार , या नाटकातील अभिनय उत्कृष्ट होता.  सर्वात जास्त लक्षात राहण्याजोगा अभिनय झाला तो गुहागर येथील राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत चांदणे शिंपीत जा  या नाटकातील अभिनय. या नाटकाने लागोपाठ 05 बक्षिसे मिळवली  - 01. उत्कृष्ट नाटक,  02. उत्कृष्ट दिग्दर्शन,  03. उत्कृष्ट संगीत,  04. उत्कृष्ट स्त्री पात्र,  05. उत्कृष्ट पुरुष पात्र.  

यात त्या स्वतः रंजना पाथरे,  बाबा वाडकर,  भरत गांगण, बाबा माजलेकर, आणि दिग्दर्शक कमलाकर भाऊ वाडकर यांनी केले.  या नाटकातील स्त्री पार्टचे पारितोषिक ताईंना  विद्याधर गोखले,  भालचंद्र पेंढारकर या  दिग्गजांच्या हस्ते मिळाले. 

त्यानंतर रंजना पाथरे यांचे सोबत पुरुषांना आवडतात बायका हे तुफान विनोदी नाटक अभिनित केले.  

 

ज्येष्ठ महिला रंगकर्मी श्रीम. शोभाताई वाडकर यांचे रत्नागिरी मीडिया परिवाराकडून  विशेष अभिनंदन आणि  शुभेच्छा 

🌹🌹🌹🌹🌹

 

माहिती  संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी 

माहिती स्त्रोत  -  योगेश बांडागळे, चिपळूण.

माहिती नावासह Like,  Share  & Forward करण्यास 

हरकत नाही.